
नवीन नांदेड। श्री. दतात्रय शिक्षण प्रसारक मंडळ सिडको नवीन नांदेड व श्री छत्रपती शिवाजी विघालय सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक सर्जेराव सटवाजी मोरे यांच्या सेवागौरव व निरोप समारंभ सोहळा २५ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थित हडको येथील दतकृपा मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.


छत्रपती शिवाजी विघालय हडको चे मुख्याध्यापक सर्जेराव मोरे ३० एप्रिल रोजी नियतवयोमानुसार प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने २५ मे रोजी सेवागौरव व निरोप समारंभ सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री दतात्रय शिक्षण प्रसारक मंडळ सिडकोचा अध्यक्षाश्रीमती कमलाबाई गंगाधर महागावे, तर प्रमुख पाहुणे संतोष गंगाधर महागावे,


राजेश महागावे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अविनाश मधुकरराव पतंगराव, डॉ. विना माधवराव लोमटे हे राहणार असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन डि. पी. शेळके, महागावे व्ही.व्ही. जी. व्ही मिरकुटे, बिरादार बि. बी. मोरे व्ही. एस, पवार बी. डी यांनी केले आहे.

