
नवीन नांदेड। व्हि.पी.के समूहाचे अध्यक्ष शेतकरी नेते जि.नांदेड येथे व्हि पी के उद्योग समूहाच्या वतीने ऊस विकास मेळाव्याला मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी हेमाला तांडा वासिंयाचा वतीने भव्य सत्कार करण्यात आला.


कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांचे एकरी उत्पादन वाढून आर्थिक विकास व्हावा यासाठी ऊस व्यवस्थापन आणि विविध शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता बाभूळगाव हेमाला तांडा येथे ऊस विकास व दुग्ध व्यवसाय मेळावा उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी मूख्य शेतकी अधिकारी पि.एम.पवार मारताळा शाखेचे शाखा व्यवस्थापक गूलाब कुरे, उबाळे , कृषी सहाय्यक अंकुश ढगे, संतोष शिंदे तसेच उस ठेकेदार विठ्ठल आडे, अंकुश आडे रंगराव आडे ,देविदास आडे ,गुलाब राठोड, दिलीप पाटील कदम गजानंद आडे प्रसराम आडे आंनदा लामदाडे दिलीप राठोड, संदीप आडे किरण आडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजक विठ्ठल आडे व अंकुश आडे बाभूळगाव हेमाला तांडावासी यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

