
लोहा/नांदेड। लोहा कंधार भागात शिवसेना जोरात आहे 50 खोके घेणारे आमदार होणार नाहीत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उमेदरवार या मतदार संघात आमदार होणार आहे.शिवसेनेची विचार धारा आजही जिवंत आहे गद्दाराना जनता माफ करणार नाही.या भागात शिवसेनेचे कार्य जोरदार दिसते अशी शाब्बासकी थाप उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या पाठीवर मारताना उपस्थित शिवसैनिक व पदाधिकारी याना संबोधित करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद आणखी वाढवा असे शिवसेनेचे खा संजय राऊत यांनी आश्वासित केले.


लोह्यात शिवसेना खा संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या सिंहगड जनसंपर्क मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात खा संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिक , पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आ रोहिदास चव्हाण, जिल्हा प्रमुख माधव पावडे, सहसंपर्क प्रमुख नांदेड कृउबा उपसभापती भुजंग पाटील, शिवसेना नेते ऍड मुक्तेश्वर धोंडगे, दशरथ लोहबंदे, आयोजक उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे,माजी प स सदस्य उत्तम चव्हाण, तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल,किसान सेनाचे तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, युवा सेना तालुका प्रमुख धनराज बोरगावकर, बाळासाहेब जाधव सुनेगावकर , नागोराव शिरसाट, शहर प्रमुख गजानन कराडे, यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


खा संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेला गद्दार झालेल्या आमदारांना फटकारले.५०खोके घेणारे या मतदार संघात आमदार होणार नाहीत तर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले व उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ठाकरे यांच्या शिवसेनेचा आमदार होणार आहे.येथे शिवसेना जोरात असल्याची पावती त्यांनी जाहीरपणे दिली.


प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांनी केले. आरंभी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली क्रेनच्या साहाय्याने खा संजय राऊत याना भलामोठा पुष्पहार घालण्यात आला .उपजिल्हाप्रमुख कऱ्हाळे यांच्या जंगी स्वागताने भारावून गेले. बंजारा समाजाचे युवा नेते माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी खा राऊत यांचे बंजारा पारंपरिक पद्धतीने तर धनगर समाजाच्या वतीने काठी अन घोंगडी देऊन स्वागत करण्यात आले.
