
हिमायतनगर। कै. दुर्गादास सराफ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दै. प्रजावानी चे हिमायतनगर प्रतिनीधी दत्ता गणपतराव शिराणे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ चे वितरण कंधार येथे दि. १९ शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते खासदार तथा दै. सामना या वृत पत्राचे संपादक मा. संजय राऊत यांच्या हस्ते, व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.


या अगोदर ही दत्ता शिराणे यांना देश्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा मराठवाड्याचे भाग्यविधाते कै. डाॅ. शंकरराव चव्हाण कार्यरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे.


दत्ता शिराणे यांना पुन्हा एकदा स्व. विलासराव देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याने, त्यांचे सहकारी पत्रकार व तसेच मित्र परिवारातून अभिनंदन करण्यात येत आहे.

