नांदेड। येत्या २३ मे रोजी नांदेड शहरात महिला मंडळाच्या वतीने बौद्ध धर्माचा सामुहिक विवाह मेळावा होत आहे. महिलांनी पुढाकार घेऊन विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल कुतूहल व्यक्त केले जात आहे.
महिलांच्या वतीने होणारा हा पाहिलाच बौद्ध विवाह मेळावा असून नांदेड येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात (डी. मार्ट रोड) दि. 23 मे 2023 सकाळी 11:30 वाजता हा शानदार समारंभ संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्याची जय्यत तयारी होत आली एकूण २० जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. समाजातील सर्वाच्या सहकार्यातुन, योगदानातुन, मार्गदर्शानातुन महिला मंडळाने नियोजन बद्ध रुपरेषा तैयार केली आहे.
गोरगरीब, कष्टकरी, निर्धार, तसेच काही सधन कुटुंबातील नवदाम्पत्यांचे 20 जोडप्यांचे मंगल परिणय होणार आहेत. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगी प्रंशात ठमके राहणार असून प्रा. रजनीताई मोहन मोरे, प्रा. डॉ. संध्या मुक्तेश्वर धोंडगे, आशा अशोक येरेकार, उज्वला महेंद्र मानकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आ.बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, साह. आयुक्त तेजस माळवदकर,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सुरेशदादा गायकवाड,विजय सोनवणे, बाबुराव गजभारे, सुखदेव चिखलीकर, प्रा. मोहन मोरे,मनिष कावळे, जेष्ठ साहित्यिक दत्ता भगत,उत्तमराव इंगळे, प्रा. पुरुषोत्तम धोंडगे, प्रविण पाटील,न्या. नारायणराव गिमेकार, अनिताताई हिंगोले,प्रशांत इंगोले,अँड. गोपाळ भगत, न्या. गौतम भरणे, रमेश सोनाळे, विनोद भरणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बौध्द विवाह मेळावा येशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा महिला समितीच्या अध्यक्षा सौ.अंजली मनोज मुनेश्वर, उपाध्यक्षा सुनिता भरत कानिंदे, सचिव वंदना सिद्धार्थ कावळे, सहसचिव कुसुम विलास धोटे, संघटक डॉ. प्रा. सुजाता कांबळे, शहर समिती, सल्लागार समिती अनेक समित्याच्या वतीने केले आहे.