
नविन नांदेड। महाराष्ट्र पोलीस भरती – २०२३ अंतर्गत नुकत्याच झालेल्या पोलिस भरती मध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये डॉ. रमेश नांदेडकर मोफत पोलीस भरती अकॅडमी चे पाच विद्यार्थी पोलीस भरतीत यशस्वी झाले आहेत.


त्या मध्ये कु.आरती बसवंते,समीर शेख, सोहेल शेख,राजेश ताडपल्लेवार, अनिल पेंडलवार यांचा समावेश आहे. या पोलीस भरती यशस्वी झालेल्या खेळाडूंचा सत्कार इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक.बी.एस शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त शिक्षक जे. ई. गोपले यांच्या हस्ते इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथे करण्यात आला. या वेळी विनोद जमदाडे, सखाराम गजले, अमर बायस, पेडाळे यांची उपस्थिती होती.


यां सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पोलीस भरती मोफत पूर्व प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रा. डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले. डॉ. रमेश नांदेडकर यांच्या वतीने सिडको – हडको भागासह परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत पोलिस भरती प्रशिक्षण देण्यात येते. आजवर या मोफत प्रशिक्षण शिबिरातून असंख्य विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेत व पोलीस भरती मध्ये यश संपादन केलेले आहे. डॉ.नांदेडकर व या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केल्या जात आहे.

