
नांदेड। राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कंत्राटी एएनएम, जीएनएम (नर्सेस) ना शासकीय सेवेत कायम करावे या मागणीसाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी परिचारिका युनियनच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.


जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका अधिपरिचारीका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत 20 मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या आंदोलनाच्यावेळी मा.आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिले होते. अद्याप त्याची पुर्तता न झाल्याने आयटकच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.


नांदेड जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्यावतीने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ज्येष्ठ कामगार नेते ऍड. कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात कॉ.संजय देशमुख, कॉ.रेखा टरके, कॉ.आशा नवले, कॉ.सुनिता, कॉ.प्रज्ञा भालेराव, कॉ.संगिता रेवरे, कॉ.रेखा आडे, कॉ. जी.एस.वाघमारे, कॉ.संगिता गोले, कॉ.अर्चना गोले यांच्यासह अन्य परिचारिका सहभागी झाल्या होत्या.

