
उस्माननगर,माणिक भिसे। उस्माननगर येथून जवळच तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे तेलंगवाडी ता.कंधार येथे दि.१९ मे च्या सायंकाळी साडे आठ वाजता आज्ञत चोरट्यांनी घरातील दाराची कडी मोडून ( ११ ,२३,०००) अकरा लाख तेवीस हजार रुपयांची चोरी करून चोरांनी पोबारा केला.सध्या उन्हाचा पारा सर्वत्र आसल्या मुळे होणा-या गरमी ( उकाड्यामुळे) घरातील सर्वमंडळी हवेशीर झोपतायेईल या विचाराने सर्वजन झोपले होते .परंतू चोराने या संधीचा फायदा घेतला आहे .सुकेश यांचे वयोवृद्ध आईवडील खालच्या मजल्यावर खोली मध्ये झोपले होते परंतू चोरट्यांनी बाहेरून दार बंद करून सर्व ऐवज लंपास केला.


पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उस्माननगर पोलीस स्टेशन पासून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे तेलंगवाडी ता.कंधार येथील सुकेश वारकड यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून लोखंडी कपाट तोडून कपाटातील ३,८३०००/ रुपये सोन्या चांदीचे दागिने व नगदी ७००००० रुपये रोख रक्कम व त्याच बरोबर त्यांच्या शेजारी राहाणारे सुनिल अशोक वारकड यांच्या घरातील बैठक रूममधील कवाडाचे कडीकोडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी ४००००/ रुपये असे एकूण ११,२३,०००/ रुपये ची मुद्दमाल आज्ञत चोरट्यांनी चोरी करून चोरांनी पळ काढला. याप्रकरणी उस्माननगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तेलंगवाडी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने श्वनपथकास पाचारण करण्यात आले होते.श्वान चोरट्याचा मागोवा घेत गाव पालथ घातलं..पण श्वनास यश मिळाले नाही.सदरील चोरट्यांनी उस्माननगर पोलीसासमोर आवाहन केले आहे. घटनेची माहिती मिळताच कंधार उपविभागीय पोलीस अधिका-यांनी भेट देवून घटनेची पहानी केली .


सुरेश वारकड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूद्ध उस्माननगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आसून या प्रकरणाचा पुढील पी.ए.आय.सुनिल पल्लेवाड हे करत आहेत.उस्माननगर पोलीस स्टेशन हददीती अनेक चोरी, ( घरफोडी झाल्या आहेत तरी त्यांचा आणखीनही तपास लागला ., तरी ह्या धाडसी चोरीचा तपास लागावा अशी जनते मधून मागणी होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन जोमाने कामाला लागले आहेत. परिसरात मटका ,दारू अशा अनेक अवैध धंदे चालू असल्याने याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
