
हिमायतनगर/नांदेड। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ऊर्ध्व पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना १२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्यावर तातडीने कार्यवाही करत जलसंपदा विभागाने यास मान्यता देऊन ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प ता.जि . नांदेड सहावा सुप्रमा प्रस्ताव महासंचालक कार्यालय मेरी नाशिक तथा राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीती -१ यांना पाठविण्यात आले होते .त्यांना सुप्रमा देण्याच्या संदर्भात आज ( दि . २३ ) रोजी नाशिक येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले .


हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ऊर्ध्व पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना १२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्याचबरोबर आर्थिक तरतूद व ,निधी उपलब्ध करण्याबरोबरच या सात बंधाऱ्यांना एक महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीतीकडून मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री .श्री एकनाथजी शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले होते.यामध्ये हदगाव तालुक्यातील पांगरा, बनचिंचोली, गोजेगाव, हिमायतनगर तालुक्यातील घारापूर, किनवट तालुक्यातील किनवट आणि मारेगाव तर माहूर तालुक्यातील धनोडा या सात बंधाऱ्यांचा समावेश आहे. हे प्रकल्प हिंगोली लोकसभा मतदार संघात समावेशीत असलेल्या नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणार आहेत.


यामुळे १० हजार ६१० हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या आदिवासी तालुक्याचा सिंचनाचा व दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


या प्रकल्पाला अंदाजित १६०० कोटी रुपये खर्च होणार असून प्रति वर्षी ५०० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहेत. चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यासह मराठवाड्यातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

यासंदर्भात जलसंपदा विभागाने यास *मान्यता देऊन ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प ता.जि नांदेड सहावा सुप्रमा प्रस्ताव महासंचालक कार्यालय मेरी नाशिक तथा राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीती -१ यांना पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार .त्यासंदर्भात उद्या महासंचालक कार्यालय मेरी नाशिक तथा राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीती -१ या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत या बंधाऱ्यांची सुप्रमा मिळाल्यास खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळेल व लवकरच काम सुरु होण्यास मदत होणार आहे .
