
नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त २७ मे ते ३१ मे २०२३ या दरम्यान श्री क्षेत्र माळेगाव (खंडोबा यात्रा) ते श्री क्षेत्र चोंडी (जामखेडर) अशी रथ यात्रा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती यात्रेचे आयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे यांनी दिली आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त दरवर्षि श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा ता. लोहा जि. नांदेड येथून पुण्यश्लोक अहिल्यामातेचे जन्मस्थळ चोंडी ता. जामखेड जि. अहमदनगर अशी रथ यात्रा काढण्यात येते. यावर्षी ची ८ वी रथ यात्रा दि २७.०५.२०२३ शनिवार ते ३१.०५.२०२३ बुधवार पर्यंत आयोजीत करण्यात आलेली आहे.


परचंडा हनुमान, परळी वैजनाथ, मुकुंदराज, अंबामाता आंबेजोगाई, चाकरवाडी, मन्मथस्वामी, पुण्यश्लोक अहिल्यामातेचे जन्मस्थळ अहिल्यासृष्टी, अहिलेश्वर महादेव या तीर्थस्थळांना भेट देत हि ऐतिहासिक रथ यात्रा चोंडी ला पोहचनार आहे. यात्रेत सहभागी होऊन भजन, कीर्तन, व्याख्यान, सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळगुंडे यांनी केले आहे. यात्रे दरम्यान ठीकठिकाणी गुणवंताचा सत्कार रथयात्रे तर्फ केला जाणार आहे.


माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भिवंडीचे प्रसिद्ध उद्योजक छगन चिमाजी पाटील खटके, भिवंडीचे नागरसेवक राहुल पाटील खटके,भाजपाचे प्रवक्ते गणेश दादा हाके यांची विशेष उपस्थिती यानिमित असणार आहे. रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन ह. भ. प. उध्दव महाराज,अॅड. श्री. शिवाजीराव हाके,इंजि. वालाजीराव काळे,प्रा. मुरहरी कुंभारगावे,संभाजी गोविंदराव धुळगंडे, किशनराव टेकाळे,गोविंद गोरे,निळकंठ उराडे,प्रा. संजीव म्हेत्रे यांनी केले आहे.
