
हिमायतनगर। रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या हिमायतनगर तालुका शहर अध्यक्ष पदी देवानंद नामदेवराव गुंडेकर यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन केले जाते आहे.


संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेली संघटना म्हणजेच रुग्ण हक्क संरक्षण समिती होय. रुग्णांची होणारी हेळसांड व त्यांना वेळेवर न मिळणारी रुग्णसेवा तसेच रुग्णांना सेवेसाठी सर्वोतोपरी कार्य करणे हे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे कार्य आहे.


देवानंद गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यात सामाजिक तथा शैक्षणिक कार्य करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रुग्ण हक्क संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. निलेश करमुडी यांच्या अध्यक्षतेखाली तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनुमंत गोत्राळ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार मोरे तथा भोकर तालुकाअध्यक्ष गंगाधर नक्कलवाड यांच्या सहकार्याने देवानंद गुंडेकर यांची हिमायतनगर तालुका शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून गुंडेकर यांचं अभिनंदन केले जाते आहे.

