
नांदेड। साप्ताहिक नंदीग्राम चे संपादक पत्रकार किरण कुलकर्णी आणि शिक्षक पद्माकर कुलकर्णी यांच्या मातोश्री दुर्गां प्रल्हादराव कुलकर्णी यांना आज सकाळी 8.17 देवाज्ञा झाली. मृत्यू समयी त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


मूळचे लोहा तालुक्यातील हळदा येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती दुर्गांबाई प्रल्हादराव कुलकर्णी ह्या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र आज दिनांक 20 मे रोजी सकाळी 8 वाजून 17 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सूना, दोन मुली , जावई नातवंड असा मोठा परिवार आहे.


दिवंगत दुर्गाबाई कुलकर्णी ह्या बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य, जिल्हा परिषद शाळा माळकौठा येथील शिक्षक पद्माकर कुलकर्णी, साप्ताहिक नंदीग्राम चे संपादक किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री तर दैनिक श्रमिक एकजूट चे संपादक कृष्णा शेवडीकर , दैनिक उद्याच्या मराठवाड्याचे संपादक राम शेवडीकर यांच्या त्या भगिनी होत. दिवंगत दुर्गा कुलकर्णी यांच्या पार्थिव देहावर दुपारी चार वाजता शांतिधाम स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

