
नांदेड। देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या धनगर समाजाचा नेता कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नांदेडमध्ये धनगर समाजाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. माजी सभापती प्रतिनिधी बबन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले पुतळ्याजवळ आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले.


देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटका विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा सिद्धरामया यांनी शपथ घेतली आहे. धनगर समाजाचे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे देशभरातील धनगर समाज मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहतो आहे . सिद्धरामया मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देशभरातील धनगर समाजामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानुसारच नांदेड येथे आयटीआय चौकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर माजी सभापती प्रतिनिधी तथा काँग्रेसचे नेते बबनराव वाघमारे यांच्या पुढाकारातून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, विमलताई पाटील, प्रा.शारदा माने यांच्यासह सुभाष मेने, रामदास वाघमारे, विजय वाघमारे, सतीश वाघमारे ,शंकर वाघमारे, कोंडीबा रेनगंडे , शेषराव मांजरे, गंगाधर वैद्य, हनुमंत डाके, अशोक शेळके, सुभाषराव पिसाळ ,उद्धव माने ,ज्ञानेश्वर काकडे ,सखाराम तुपेकर, मुरारी कुंभारगावे, गणेश वाघमारे, चांदू बाईकरे, पांडुरंग हुलगुंडे, सागर काकडे ,साईनाथ पेटकर , रोडे चंद्रकांत, आदींची उपस्थिती होती.

