
नांदेड। सद्या देशामध्ये आयपीएल आणि वाढत्या बेरोजगारीचा प्रचंड फिवर असून तरुणाईचे आकर्षण व आदर्श असणारे क्रिकेट पटू आणि सुप्रसिद्ध अभिनेते जुगार खेळा आणि गुटखा खा! अशा जाहिराती करून देशातील युवकांना वेसनांध व जुवारी बनण्यास प्रोत्साहन देत आहेत.


अशा जाहिराती तातडीने थांबवाव्यात आणि जाहिराती करणाऱ्या खेळाडूवर तसेच चित्रपटसृष्टीतील अभीनेत्यावर तसेच संबंधितावर कठोर कारवाई करावी आणि त्या जाहिरातीचे प्रसारण थांबवावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नांदेड शहर सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.१६ मे रोजी माकपच्या लेटरपॅडवर देण्यात आले आहे.


देशाचे भवितव्य तरुण पिढी असून त्यांना जंगली रम्मी, रम्मी सर्कल व इतर प्रकारचे जुगार खेळण्याचे आवाहन करणाऱ्या तसेच क्रिकेटवर सट्टा लावण्यास प्रवृत करणाऱ्या जाहिराती बंद कराव्यात अशी मागणी कॉ. गायकवाड यांनी केली असून योग्य कारवाई झाली नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

