
नांदेड| शालेय जीवनातील 1993 च्या बॅचमधील कंधार मधील मनोविकास विद्यालय, शिवाजी हायस्कूल, गणपतराव मोरे विद्यालय, जि.प मुलांचे हायस्कुल, जि.प मुलींचे हायस्कूल या पाच शाळेतील विद्यार्थी तब्बल तीस वर्षानंतर नांदेड मधील तुलसी कम्फर्ट हॉटेलमध्ये एकत्र येऊन स्नेहसंमेलन उत्साहत साजरे केले तब्बल तीस वर्षानंतर भेटीगाठी झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. विद्यार्थी जीवन व आजचे जीवन या सर्वांचा अनुभव सांगत आनंद साजरा केला गेला आहे.


गेट-टुगेदर घेण्यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा असे विनंती सर्वांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक मंगेश काप्रतवार, बालाजी नागरगोजे , राजाराम व्यवहारे, जालिंदर पाडदे, माधव कांबळे, गणेश एमेकर, उमेश पदमवार, व्यंकटेश पाटील, प्रतिभा बिडवई, नंदा डोंपले, किरण बनसोडे, मनीषा नळगे, शोभा पाटील. हे होते तर सूत्रसंचालन माधव कांबळे व जालिंदर पाडदे यांनी केले.


तर डॉ.भगवान कानगुले, नितीन इंगोले, डॉ कैलास गीते, गजानन लाडकेकर, नरेंद्र केजकर, व इतर मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. अलका महाजन यांनी एका मजेदार खेळाचे आयोजन केले. गेट-टुगेदर ची सांगता होताना आपण सर्वजण पुन्हा भेटू हेच वाक्य प्रत्येकाच्या मुखात होते. पुढील गेट टुगेदर हिवाळ्यामध्ये कंधार येथे घेण्यात येईल, असे मंजु कदम यांनी सांगीतले.

