
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। बिनविरोध निवडणूक पार पडलेल्या नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीनिवास पाटील चव्हाण तर उपसभापतीपदी शिवराज पाटील होटाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस व भाजपा एकत्र येवून निवडणूक बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर दि.22 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली.


यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जी.आर.कौरवार. होते तर या प्रसंगी माधवराव इश्वरराव बेळगे , हणमंत दत्ता कदम. श्रीनिवास व्यंकटराव चव्हाण, श्रावण शंकरराव भिलवंडे, साहेबराव बापुराव पाटील. नारायण देवराव पवार,संतोष व्यंकटराव पुयड, शोभाबाई विनायकराव शिंदे, आशाबाई लक्ष्मण देगलुरे, गणपतराव बसवंतराव पाटील, विश्वनाथ मष्णाजी अब्दागीरे, शिवराज भाऊराव पवार, भेलांडे यादवराव नारायणराव भेलोंडे , विश्वनाथ प्रभू साखरे , नरेश आरगुलवार .श्रीनिवास जवादवार. पंढरीनाथ बाबूराव भालेराव अदि संचालक उपस्थित होते.


सभापतीपदासाठी श्रीनिवास पाटील चव्हाण तर उपसभापती पदासाठी शिवराज पाटील होटाळकर यांचेच एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. निवडीनंतर छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, हनमंतराव पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, संजय बेळगे, कुंटूर बाजार समितीचे उपसभापती मनोज मोरे, बालाजी पवार, डॉ. विश्वास चव्हाण, दयानंद भालेराव, बालाजी पा. भोपाळकर, प्रकाश पा. सातेगावकर, शिवराज वरवटे.दत्ता मामा येवते,


बालाजी मद्देवाड, मनोहर पवार, संजय कदम, रवींद्र पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील चव्हाण.सय्यद रहिम, बावने सर, लक्षण पा. देगलूरे, विजय चव्हाण, श्रीनिवास शिंदे, पंढरीनाथ भालेराव, दिलिपराव धर्माधिकारी, गणेश पा. कौडगावकर, संभाजी जाधव, व्यंकट कोकणे, सुरेश कदम खंडगावकर, राहूल पा. नकाते, प्रदिप कल्याण, विनायक पा. शिंदे, पांडु पाटील चव्हाण.माणिक चव्हाण साईनाथ चन्नावार . सोमनाथ बैलके.यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
