नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १९ मधील गेल्या अनेक वर्षो पासून नागरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. शंकर नगरीतील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मोहनरावजी हंबर्डे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
या परिसरातील नागरिकांना रस्ते,नाली,ड्रेनेजच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तळमळ करणारे लोकनेते आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी आज परिसरातील नागरीकांच्या उपस्थितीत ड्रेनेज लाईन चे उदघाटन केले.वाढदिवसाच्या दिवशी शंकर नगरीतील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आमदारांना परिसरातील नागरीकांनी आशीर्वादाच्या लाखोळ्या वाहिल्या. हंबर्डे यांनी नागरिकांना आव्हान केले होते की, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा देताना हार,तुरे न आनता त्या ऐवजी गोर गरीब जनतेला औषध वाटप करा. त्यांनी दिलेल्या सुचनेचे जनतेने पालन करत औषध गोळ्याच्या शुभेच्छाने आमदार भाराऊन गेले.
शंकर नगरी परिसरातील सर्व नागरिकांनी वाढदिवसाच्या व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी बाबूराव धुमाळ, संग्राम सांगळे,नाईकवाडे साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवराम लुटे,जयसिंग हंबर्डे, प्रताप हंबर्डे, विश्वाबंर धुमाळ,प्रदीप गीते, प्रा.अशोक चौकले,शिवाजी पा.तेलंग, निवृत्ती तेलंग,रामचंद्र जायभाये,मोतीराम पवार, दशरथ कोडेवाड,वसंत मलदोडे,गजानन वानखेडे, शिवानंद बारसे,
बाबू मुंढे, मोरे सर, उमरेकर सर,गायकवाड पाटील, दिघे पाटील, गुलाबराव पाटील कदम,अक्षय जाधव, दिलीप कारामुंगे,आदित्य अनंतवार,कोल्हे साहेब, काचावार सावकार, फोबांवार सावकार, अनिल चित्रावार,शिंदे मामा, बोडलवार ,करेवार ,देविदास पांचाळ, वैजनाथ सोनटक्के, डुबुकवाड ,पंदलवाड ,चांदणे सर,तुकाराम सावंत याच्या सह परिसरातील नागरीक उपस्थित होते.