
नांदेड/ हिमायतनगर। हदगाव तालुक्यातील तामसा सर्कल मधील अतिशय दुर्गम गाव कुसळवाडी येथील चंद्रभागाबाई विश्वनाथ भूरके यांची एकष्ठी तर सुमनबाई श्रीपती देशमुखे यांचा अमृत महोत्सव संपन्न झाला आहे. या दोन्ही परिवाराने काबाड कष्ट करुन मुलांना घडविले. चंद्रभागाबाई विश्वनाथ भुरके या माता पित्याने प्रतिकुल परिस्थीत सालगडी राहून तर आईने मजूरी करुन एक शिक्षक तर दोन एम.डी. डाॅक्टर बनवले. मुलांनी ही हाताला मिळेल ते काम ,मजूरी करुन शैक्षणिक खर्च भागविला. जीवनाचे सोनं झाल. पाटीची संगत सुटू न दिल्याने आयुष्यभर पोळी मिळाली अशा भावना तिन्ही भावडांनी व्यक्त केल्या.


या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष ग्रामिण रुग्णालयाचे अधीक्षक डी.डी.गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे आ. माधवराव पाटील जवळगावकर, डाॅ. शिवशंकर बुरकुले, डाॅ. उतम वाघतकर, सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार,अॅड. रामदास डवरे, विश्वनाथ धुमाळे, उपसभापती शंकर मेंढके, संतोष डवरे, सरपंचशंकर सोनाळे, उपसरपंच हेमंत नरवाडे होते. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना अन्य कार्यक्रमाला जायायचे असल्याने त्यांनी शुभेच्छा देतांना म्हटले,आई वडिलाचे ऋण कोणीच फेडू शकत नाही. त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही घडलो, मान,धन, नोकरी, प्रतिष्ठा आई वडिलाची पुण्याईने मिळाली आहे.. गावाची नाळ धरुन भुरके परिवार आहे. डाॅ. माधव भुरकेनी आई वडिलाचा अभिष्ठचिंतन सोहळा घडून आणला हा स्तुत्य आदर्श उपक्रम आहे. असे आ. जवळगावकरांनी गौरवउदगार काढले.


या प्रसंगी शंकर सोनाळे , सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार ,हेमंत नरवाडे, संतोष डवरे आदीने यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आई वडिल यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. मुलांनी शिक्षण घेवून परिवाराला पुढे न्यावे व लहान भावंडांना शिक्षणासाठी मदत करावी आणि शिकलेल्या मुलांनी माता पित्याची सेवा करावी असे आवहान डाॅ. डी.डी. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन डाॅ. बळीराम भुरकेने केले. तर अभार डाॅ. माधव भुरके यांनी मानले.

