
श्रीक्षेत्र माहूर। हिंदू क्रांतीसूर्य विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती सोमवार दिनाक २२ रोजी माहूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून शोभा यात्रा काढण्यात आली होती.


या मिरवणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,रा.काँ तालुकाध्यक्ष मेघराज जाधव.युवासेनेचे नेते यश खराटे,उपनगराध्यक्ष नाना लाड नगरसेवक गोपु महामुने सचिन नाईक प्रतिनिधि रवि पराते, माजी सभापती मारोती रेकुलवार यांनी व इतर नेत्यांनी सहभाग नोंदवून आयोजकांचा उत्साह वाढविला.


विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त सोमवार रोजी भव्य शोभायात्रा मिरवणुकिचे आयोजन महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक जयंती उत्सव समिती कडून करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षीही (तिथी नुसार) महाराणा प्रताप यांची ४८३ जयंती २२ मे रोजी साजरी करण्यात आली. सकाळी विरशिरोमनी महाराणा प्रताप चौक प्रभाग क्र.५ येथे सकाळी ९ वा प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात येऊन सायंकाळी ५ वाजता शहरातून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुक मार्गान शोभायात्रा काढण्यात आली.


उत्सव समितिचे अध्यक्ष सागर चुंगडे व राजपूत क्षत्रिय समाज संघटना माहूर तालुका अध्यक्ष पवन चौव्हाण यांनी समिती ला सोबत घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडली.या मिरवणुकीत विविध समाजातील विविध पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते सहभागी झाले होते.या मिरवणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,युवासेनेचे नेते यश खराटे, माजी सभापती मारोती रेकुलवार गोपू महामुने यांनी सहभाग नोंदवून बँजो च्या तालावर ठेका धरला.या वेळी विजय आमले देविसिह हजारी सुनिल चुंगडे, उदयपालसिंह मरमट, रीतेश चंदेल,हर्ष दिक्षीत, अंजय दिक्षीत,मुकेश चुंगडे,सोनु ठाकुर,जय ठाकुर कालीदास नैताम परीहार,राज ठाकूर, विजय हजारी. सुरज बारवाल. यश चुंगडे .अमोल धनावत. यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते
