
नांदेड| ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करून सत्ताधार्यांकडून विरोधकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जाणिवपुर्वक त्रास देत ईडी चौकशीला बोलाविले आहे. हा सत्तेचा होत असलेला गैरवापर थांबविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली दि. 22 मे रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.


लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजपशासीत राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. लोकशाही मुल्यांना पायदळी तुडविण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ज्येष्ठ हसन मुश्रीफ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्याही नेतेमंडळींवर सुडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते-मंडळींवर होत असलेली कारवाई त्वरीत थांबविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. कल्पनाताई डोंगळीकर, जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापूरकर, सिंधुताई देशमुख, प्रेमजितकौर कोल्हापूरे, राहुल जाधव, मोहम्मदी पटेल, सईदा पटेल, श्रीधर नागापूरकर, शफी उर रहेमान, फैजल सिद्धीकी, अमितसिंघ सुखमनी, महेंद्र भटलाडे आदी जणांची उपस्थिती होती.


महाराणा प्रतापसिंह यांना राष्ट्रवादीकडून अभिवादन

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 483 व्या जन्मोत्सवानिमित्त नांदेड जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दि. 22 मे रोजी अभिवादन करण्यात आले.

गांधीनगर येथील महाराणा प्रताप चौकातील वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्या नांदेड जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी गंगाधर कवाळे, गणेशअण्णा तादलापूरकर, श्रीधरराव नागापूरकर, कल्पना डोंगळीकर, सिंधुताई देशमुख, मोहम्मदी पटेल, फैजल सिद्धीकी, प्रेमजीतकौर कोल्हापुरे, राहुल जाधव, सईदा पटेल, महेंद्र भटलाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
