
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। एका घरफोडीच्या तपासात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलीस कस्टडीत माहूर येथील वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या घराच्या घरफोडीची कबुली देत एक लाख रुपये किमतीची शासकीय पिस्टल ही आपणच चोरल्याची कबुली देत ती माहूर च्या जंगलात पुरून ठेवल्याचे सांगितल्या ने माहूर पोलिसांनी ती शासकीय पिस्टल आज दिनांक २३ रोजी ताब्यात घेतली आहे.


काल दिनांक २२ रोजी घरफोडी च्या तपासात दिग्रस जि यवतमाळ वरून जावेद अब्दुल सत्तार (३४) याला सापळा रचून अटक केली होती.आज मंगळवार रोजी कोठडी दरम्यान पोलिसांनी शहरातील इतर चोरीच्या घटनाबाबत आरोपीची कसून चौकशी केली असता त्याच परिसरात एक पिस्टल चोरी केल्याची आरोपीने कबुली दिली. माहूर वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव हे देवदर्शनासाठी रजेवर गेलेले असतांना त्यांच्या घरातून दि. ०८ ऑक्टोबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घर फोडून घरातील शासकीय पिस्टल ज्याचा क्रमांक १६७२ १४०९ हे ९ एमएम व पर्स मधील ३ हजार रोख रक्कम असा एकूण १ लाख ३ हजारचा मुद्देमाल चोरीला गेला होता.रोहित जाधव यांनी या प्रकरणी दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी माहूर पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दाखल केली होती.


या पिस्टल बाबत पोलिसांनी विचारपूस केली असता सदर पिस्टल ही मातृतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटन यात्रीनिवासच्या पार्किग जवळील पडित असलेल्या क्रीडा संकुल च्या बाजूला खडडयात गाडून ठेवल्याचे आरोपीने सांगितल्याने सायंकाळी ५:३० वा. स.पो.नि. श्रीधर जगताप, जमादार विजय आडे, पो.हे.कॉ. बाबू जाधव, पो.कॉ. सुशील राठोड, चालक गुरनुले यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सदर पिस्टल मिळून आले. सदर पिस्टल सरकारी पंच न.प. चे कर निर्धारक प्रशासकीय सेवा गंगाधर दळवी, सुनील वाघ यांच्या समक्ष पंचनामा करून पोलिसांनी पिस्टल ताब्यात घेतले.


ही कार्यवाही माहूर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षकअविनाश कुमार नांदेड, डॉ.खंडेराव धरणे भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश डोंगरे माहूरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शना खाली सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दीपक ओढने यांच्या विशेष सहकार्य केली. आरोपीची माहूर पोलिसाकडून कसून चौकशी सुरु असून माहूर शहरात गत वर्षभरात घडलेल्या चोरी घरफोडयाचे रहस्य उलगडण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी स.पो.नि.श्रीधर जगताप यांनी सांगितले.
