
नांदेड। महिलांच्या पुढाकाराने नांदेड येथे आयोजीलेल्या बौद्ध सामुहिक विवाह मेळाव्यात २० जोडप्यांचा मंगल परिणय मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.


महिलांच्या संयोजनाखाली होणारा हा पाहिलाच बौद्ध विवाह मेळावा होता.नांदेड येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात हा शानदार समारंभ संपन्न झाला. समाजातील सर्वाच्या सहकार्यातुन, योगदानातुन, मार्गदर्शानातुन महिला मंडळाने नियोजन बद्ध तयारी केली होती. सुमारे ५ हजार वऱ्हाडी वधू वराना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. गोरगरीब, कष्टकरी, अपंग,निराधार तसेच काही सधन कुटुंबातील नवदाम्पत्यांचे मंगल परिणय पार पडले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगी प्रंशात ठमके ह्या होत्या.


विवाह विधी भन्दत पय्याबोधी, भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य रविकिरण जोंधळे, बौद्धाचार्य अनिलउमरे यांनी पार पाडला. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत,पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष बापुराव गजभारे,नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते रमेश सोनाळे, पीआरपीचे अध्यक्ष विनोद भरणे,माधवराव जमदाडे,रंजनी मोरे, उज्वला मानकर, अनिताताई हिंगोले, प्रशांत हिंगोले, यादव भवरे, अरूण आळणे, टी. पी. वाघमारे, सुखदेव चिखलीकर, प्रकाश गायकवाड, संध्या धोंडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुञसंचलन कुमार अभंगे यांनी केले.


बौध्द विवाह मेळावा येशस्वी करण्यासाठी समितीच्या अध्यक्षा सौ.अंजली मनोज मुनेश्वर, उपाध्यक्षा सुनिता भरत कानिंदे, सचिव वंदना सिद्धार्थ कावळे, सहसचिव कुसुम विलास धोटे, संघटक डॉ. प्रा. सुजाता कांबळे, भरतकुमार कानिंदे, पुष्पा भरणे, वनिता उमरे, वैशाली सोनसळे, सुनील भरणे, भास्कर भगत,गुणवंत भगत,नारायण घुले,अनिल उंबरे,अरुण भरणे,विशाल पाटील, सचिन गायकवाड,प्रशिक कावळे,शामराव धुपे,राहुल उंबरे,प्रवीण सरपे, कोंडीबा वासाटे,प्रेमदास घुले,सुरेश नगारे,शेषराव घुले,विठ्ठल भवरे यांनी अथक परिश्रम घेतले.
