
नवीन नांदेड। श्री बालाजी मंदिर हडको आनंद सागर सोसायटी येथे ब्रह्मोत्सव अन्नदान मंडपाच्ये बांधकामासाठी आ.मोहनराव हंबरडे यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या २० लक्ष रूपयांचा भूमिपूजनसोहळा २३ मे रोजी मंदीर परिसरात करण्यात आला.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबरडे यांच्या निधीतून सभामंडप बांधकामासाठी वीस लाख रुपये मोहन अण्णा हंबर्डे यांच्या निधीतून मंजूर करून हॉलच्या बांधकामाचे भूमि पूजन वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले, व वाढदिवसानिमित्त देवस्थानच्या वतीने सर्व मंडळाच्या वतीने व भक्ताच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.


यावेळी मंदिराचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार विश्वस्त किशोर देशमुख ,बाळासाहेब मोरे ,प्रकाश सिंग परदेशी ,विवेकानंद देशमुख ,माजी नगरसेवक प्रा. अशोक मोरे, माजी नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, शिवराम लुटे, नितीन झरीकर,कविता चव्हाण,सुमन राठोड,राजु लांडगे,गजानन कहाळेकर, भिमराव जमदाडे,पत्रकार बंधू व इतर भक्तिमंडळ उपस्थित होते.

