
नांदेड। जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आम्ही कटिबद्ध ही थीम घेऊन राज्यात 22 ते 28 मे दरम्यान जनजागृती सप्ताह राबवल्या जात आहे. त्या औचित्याने आज गुरुवार दिनांक 25 मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरामध्ये अमरावती येथील क्षितिज फाउंडेशनच्या संस्थापक स्नेहल चौधरी यांचे मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी व्याख्यान ठेवण्यात आले आहे.


आभासी पद्धतीने त्या महिलांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी दिली आहे.

