
नांदेड। नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या पथकाने विष्णुपूरी गावातून अवैधरित्या गोण खनिज वाळू उपसा करणारे तिन हायवा,व दोन टिप्पर यामधून होणारी जवळ 21 ब्रास वाळू जप्त केली आहे.


24 मे 23 रोजी पहाटे 12.30 वाजता प्रभारी जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगांवकर व विकास माने उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार संजय वारकड हे स्वतः व मुगाजी मुंजाजी काकडे नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड विष्णुपूरी येथे गावात अवैध वाळू उपसा करणा-या घाटावर पथकासह जावून कारवाई केली आहे.5 ब्रास वाळू वाहतूक करणा-या 3 हायवा गाडया व 3 ब्रास वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर असे एकूण ५ वाहने जप्त करण्यात आले आहे.


सदर वाहने जप्त करुन तहसील कार्यालयाच्या अवारात जमा करण्यात आले आहे.सदर वाहनावर उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी अनिरुध्द जोंधळे, राजेंद्र शिंदे, अनिल धुळगंडे तलाठी श्री.उमाकात भांगे, वमाधव भिसे व वियज रणविरकर उपस्थित होते. यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यातर्फे पोलीस बंदेाबस्त पूर्वीण्यात आला होता.


अवैध वाळू उपसा व वाहतुक करणा-या सर्व लोकांवर व वाहणावर यापूढे अशीच कारवाई करण्यात येवून त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी कळविले आहे.
