
नांदेड। इयत्ता बारावीचा राज्याचा निकाल हा 91.25 % एवढा आहे. त्यामध्ये लातूर विभागाचा निकाल 90.37% एवढा आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल 88.56 असा आहे. लातूर विभागात नांदेड जिल्ह्यात एकूण 38,928 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 38,276 एवढे विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले त्यापैकी 33,901 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 88.56% एवढे आहे.


या परीक्षेमध्ये एकूण 21,135 मुले हे प्रविष्ट झाले होते त्यापैकी 17,986 म्हणजेच 85.10% एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 17,048 मुलींपैकी 15,834 मुली या पास झालेले आहेत म्हणजेच 92.81% एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. *मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे जास्त आहे*. नांदेड जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल पंचायत 95.78% आहे तर कला शाखेचा निकाल 79.41% आहे वाणिज्य शाखेचा निकाल 88.69% आहे. अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेडयांच्याकडून मिळाली आहे.

