
नवीन नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त , गोरगरीब जनतेची आपल्या हातून एक सेवा घडो म्हणून, शासकीय रुग्णालयात औषधी तुटवडा भासत असल्याचे लक्षात घेऊन मोहन अण्णां हंबर्डे यांनी वाढदिवसासाठी भेट म्हणून हार गुलदस्ते आणण्यापेक्षा गोरगरीब जनतेसाठी व रूग्णसाठी साठी गोळ्या औषधे हे वाटप करावे असे आवाहन केल्यानंतर तुप्पा युवा नेते चिमणाजी पाटील, कांकाडी ऊपसंरपच सुदिन बागल, व बाभुळगावचे संरपच पुंडलिक मस्के यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांच्या सहकार्य हा औषध साठा वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देण्यात आल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे औषध साठा वाटप २५ मे रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड यांच्या कडे आमदार हंबर्डे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.


आमदार मोहन आन्ना हंबर्डे यांच्या २३ मे रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे रूग्णांसाठी औषधी तुटवडा होत असल्याने केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत तुप्पा युवा नेते चिमणाजी पाटील,काकांडी ऊपसंरपच सुदींन बागल, बाभुळगावचे संरपच पुंडलिक मस्के यांच्या पुढाकाराने उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध औषधांच्या तुटवडा लक्षात घेऊन विविध औषधे संकलन करून हा साठा ,२५ मे रोजी आ. हंबर्डे यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे संकलन केलेल्या मोफत औषध वाटप करण्यात आले.


यावेळी तुप्पा नगरीच्या सरपंच मंदाकिनी ताई यन्नवार उपसरपंच दत्ता कदम , बाबुळगाव चे सरपंच पुंडलिक मस्के, काकांडीचे उपसरपंच सुदीन बागल ,माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, तुप्पा गावचे युवा नेते चिमणाजी पाटील कदम ,माजी सरपंच अमोल गोडबोले, माजी उपसरपंच बबन पाटील कदम, शेख चांद पाशा, मुन्ना पाटील पवार, सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर यन्नावार, ग्रामपंचायत सदस्य गावचे जेष्ठ नागरिक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व गावकरी इतर मान्यवर यांच्या उपस्थित देण्यात आले.

