नांदेड। बेघर पात्र कुटुंबांना केंद्र आणि राज्य शासनाच्या आवास योजनेतून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेस संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज शुक्रवार दिनांक २६ मे रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
नांदेडच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विकासाच्या वाटेवर हा विशेष कार्यक्रम नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती या सदरातून दिली जात आहे. या सदरात डॉ. संजय तुबाकले यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीमधून पंतप्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आदी घरकुल योजना, योजनेचे निकष, अनुदान, घरकुल बांधकामाची पद्धत, लाभार्थी निवड आदी विषयासंदर्भात डॉ. तुबाकले यांनी माहिती दिली आहे.