नायगाव, रामप्रसाद चन्नावार। फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचे एकूण 734 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते त्यापैकी 141 विद्यार्थी विशेष प्रविण्यसह उत्तीर्ण झाले तर 376 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले. एकूण 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 691 विद्यार्थी पास होऊन महाविद्यालयाचा निकाल 94.52% एवढा लागला आहे.
महाविद्यालयातील विज्ञान विभागात एकूण 498 विद्यार्थ्यांपैकी 493 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 98.99%, कला शाखेत 182 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सरासरी निकाल 81.31% एवढा लागला.
वाणिज्य विभागातून एकूण विद्यार्थी 51 परीक्षेत बसलेले होते त्यापैकी 50 विद्यार्थी पास झाले असून सरासरी निकाल ९८.०३ टक्के एवढा लागला तर एच. एस. व्ही. सी. विभागातून 44 विद्यार्थ्यापैकी 39 विद्यार्थी पास झाले असून विभागाचा निकाल ८८.६३ टक्के एवढा लागलेला आहे.
विज्ञान विभागातून प्रथम वडजे प्रसाद गुलाब 90.33%,द्वितीय कु. नरोड साक्षी गणेश 86.83% तृतीय कु. शिंदे ऋतुजा व्यंकटी ८६.३३ टक्के .गुण मिळाले.
कला विभागातून प्रथम चौधरी योगेश बालाजी 88.83%, द्वितीय कु. बेंद्रीकर स्नेहा सुभाष 84.50%, तृतीय कु. हिवराळे धनश्री सुरेश ८२%गुण प्राप्त झाले.
वाणिज्य विभागातून प्रथम ईबितवार पियुष हनुमंत 85.33%, द्वितीय येलकेवाड महेश यादव 82.67%, तृतीय क्रमांक कु. मोटरगे लोकेश्री गणपत 81.33% यांनी पटकावला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष मा.आ. वसंतराव पाटील चव्हाण, सचिव प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, संस्थेचे ज्येष्ठ संचालक केशवराव पाटील चव्हाण ,जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.प्रभाकर पवार, पर्यवेक्षक प्रा. गणेश देवडे पर्यवेक्षिका प्रा. सौ. शोभा शिंदे यांनी केले.