
नवीन नांदेड। म.रा. मा. व उच्च मा. मंडळाने सन 2022 ॒23 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात कुसुमताई उच्च माध्यमिक विद्यालयाने यश संपादन केले.


विज्ञान शाखेत 162 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात विशेष प्राविण्यात 10 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 42 विद्यार्थी व व्दितीय श्रेणीत 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकुण निकाल 96.29% ऐवढा लागला.कला शाखेत 147 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.


त्यात 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्यात 01 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 25 विद्यार्थी, व्दितीय श्रेणीत 58 विद्यार्थी व पास 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.असुन विज्ञान व कला शाखेचा एकूण निकाल 88.67% लागला असून सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव बिरादार एस.एम. सहसचिवा सौ. शशिकला बिरादार, मुख्याध्यापक जोशी के.ए.पर्यवेक्षक चाटे संजय व उच्च माध्यामिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मनपूर्वक अभिनंदन केले.


इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज सिडको चे बारावी परीक्षेत घवघवीत यश…..
नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर बोर्ड ने जाहीर केलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज, सिडको चा निकाल 85 टक्के लागला आहे.

दि. 25 मे 2023 रोजी जाहीर केलेल्या बारावी परीक्षेच्या घोषित झालेल्या निकालात इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज सिडकोचा एकूण निकाल 85 टक्के लागला आसून यात विज्ञान शाखेच्या 98 टक्के तर कला शाखेचा 72 टक्के लागला आहे.

उत्तीर्ण विदयार्थी यांच्ये अभिनंदन प्राचार्य .बी.एस. शिंदे, सुपरवायझर प्रा.य.सी चंदेल, प्रा. एस. डी. शिंदे, प्रा झड. एस. फाजगे, डॉ.आर.टी.नांदेडकर,डॉ. एस. एम.देशमुख, प्रा. एस.डी.कोठोळे, प्रा. एस.आर.सतानुरे, प्रा. एन. डी.दारमोड व शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांनी केले आहे.
