
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विदयालयाचा मार्च/एप्रिल 2023 मध्ये झालेल्या परीक्षेचा एकुण निकाल 88.75 टक्के लागला असुन, कला शाखेचा निकाल 84.61 टक्के व विज्ञान शाखेचा निकाल 96.58 टक्के आहे.


कला शाखेतुन गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु. रोहिणी धर्मा कांबळे (88.33%), व्दितीय क्रमांक कु. गडडमवार तन्वी सुरेश (85.00%) व तृतीय क्रमांक कु पायल दशरथ कदम (84.00%) विज्ञान शाखेतून गुणानुक्रमे, प्रथम क्रमांक कु. दळवे सानिका सदाशिव (83.17% ) व्दितीय क्रमांक कु. मोनिका मारोती वारकड (74.83%) व्दितीय क्रमांक विठ्ठल गजानन राउतवार (74.83%) व तृतीय क्रमांक युवराज परमेश्वर जगताप (72.83 % )


एकुण परीक्षार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य प्राप्त एकुण 21 विदयार्थी प्रथम श्रेणीमध्ये 72 उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा मा. सूर्यकांता पाटील (माजी केंद्रिय राज्यमंत्री, भारत सरकार), श्री अरुणजी कुलकर्णी सर (सचिव, मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर संचलित ) व सर्व संचालक मंडळ तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक श्री रणखांब सर यांनी केले आहे.

