
नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार 25 मे रोजी बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. या मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही नवीन नांदेड भागातील दर्जेदार व उत्कृष्ट शिक्षण व सर्वोच्च निकाल देणारे कनिष्ठ महाविद्यालय म्हणुन जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड जि.नांदेड संचलित शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, सिडको, नवीन नांदेडची ख्याती आहे.


यंदाच्या बारावी परीक्षेमध्ये या कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व विज्ञान या दोन शाखांचा एकत्रीत निकाल 96.49 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.20 टक्के लागला असुन कला शाखेचा निकाल 89.13 टक्के लागला आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव नागोराव जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपप्राचार्य रवी शिवाजीराव जाधव, प्राचार्य प्रा. एस.एम. देवरे, पर्यवेक्षक एन. एम. भारसावडे,वरीष्ठ लिपीक वसंत वाघमारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान यंदा माकणे प्रेरणा सूर्यकांत या विद्यार्थीनीस मिळाला असून द्वितीय क्रमांक ढेंबरे ओंकार लक्ष्मण तर तृतीय क्रमांक शिंदे रितेश तीरुपती याने मिळवला आहे,कला शाखेतून प्रथम येण्याचा मान यंदा भारती राणी मच्छिंद्र या विद्यार्थीनीस मिळाला असून द्वितीय क्रमांक जाधव अदिती नारायण तर तृतीय क्रमांक गिरडे अनुसया नागोराव हीने मिळवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

