
हिमायतनगर। हिमायतनगर तालुक्यातील मौजे जिरोना येथील एका शेतकऱ्याच्या आठ वर्षाच्या चिमुकलीवर खाऊचे आमिष दाखवून शेजारील एका ५० वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तात्काळ हिमायतनगर पोलिसांनी सदरील आरोपीला अटक केली असून, त्यास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जीरोना येथील नागरिकांतुन केली जात आहे. या घटनेबाबत पोलिसांनी पोस्को कायदा अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.डी. जाधव या करीत आहेत.


याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेलं सविस्तर वृत्त असे की, दि.२५/०५/२०२३ रोजी सकाळी ८ वा. चे सुमारास आरोपी डिंगांबर थारू राठोड हे फिर्यादीचे घरी आला. आणि 8 वर्षीय चिमुकलीला घराबाहेर चल तुला खाउला पैसे देतो म्हणुन 10 रुपये दिले. मुलीला घरातुन सोबत घेवुन गेला, अर्धा तास झाल्यानंतर देखील चीमुकली घरी आली नाही. त्यावेळी घरच्यांनी तिची शोधा शोध करत होते. त्यावेळी गावातील ज्ञानेश्वर बाबाराव वानखेडे, ओमकार दत्ता जाधव यांना विचारले असता त्यांनी चिमुकलीला डिंगाबर थारु राठोड याचे सोबत पांडुरंग माधव वानखेडे यांचे शेतात पाहील्याचे सांगीतले.


तेव्हा फिर्यादी सोबत ओमकार व ज्ञानेश्वर असे तिकडे गेले असता मुलीला आवाज दिला. यावेळी चिमुकली मुलगी शेतातील कापसातुन रडत बीना कपडयाची येत होती. चिमुकलीने पळत येवून रडत रडत सांगितले कि, मला डिगांबर काकाने खाउ देतो म्हणुन 10 रुपये देवुन शेतात कापसामध्ये घेवुन गेला. माझे कपडे काढले व अत्याचार केल्यानं मी जोरात रडु लागल्याने माझ्या आई व ईतर लोकाचा आवाज आल्याने त्याने मला हाकलुन दिले. अशी हकीगत मुलीने सांगीतली असल्याचे फिर्यदिने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.


चिमुकली रडत येत असल्याने डिगांबर थारु राठोड रा. रमनवाडी यास कोठे आहे हे बघत असतांना तो पॅन्ट घालत घालत शेतातुन पळत होता. त्याचे शर्ट देखील त्याचे हातात होते तो पळुन गेला त्यानंतर मूलीस कपडे घालून घरी घेवून आल्यानंतर घडलेला प्रकार घरी सर्वाना सांगीतला. व हिमायतनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे. यावरून हिमायतनगर पोलिसांनी सदरील आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 376 (१), भारतीय दंड संहिता 1860 कलम (२)(j), बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम १२, अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एस.डी. जाधव या करीत आहेत.
