
हिमायतनगर। तालुक्याचा सरासरी निकाल 95.41 टक्के लागला असून तालुक्यात 90 टक्याचा एकही विद्यार्थी नाही .कोरोणा काळातील ही बॅच आहे. तालुक्यातून एस.एस.सी. परीक्षेला 729 मुले बसले होते. त्यापैकी 27 विद्यार्थी डिस्टीक्शन मध्ये आले तर प्रथम श्रेणीत 118 आले, द्वितीय श्रेणीत 305 , तर पास 171 असे एकूण 621 विद्यार्थी पास झाले आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.


शाळा निहाय निकाल खालील प्रमाणे मनिषा आश्रम विज्ञान शाखेचा शाळेचा 100 टक्के , तर कला शाखा 58.82 टक्के आणि हाजी आदमजी शाळेचा विज्ञान शाखा 100 टक्के निकाल लागला आहे . राजा भगीरथ मा.व उच्च मा. विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 98.94 टक्के तर कला शाखेचा निकाल 75.30 हुतात्मा जयवंतराव पाटील ज्यूनिअरचा विज्ञान शाखेचा निकाल 96.58 टक्के आणि कला शाखेचा निकाल 81.61 टक्के लागला आहे. दुधड आश्रम शाळेचा कला शाखेचा निकाल 91.48 लागला आहे.


शहरातील राजा भगीरथ मा.व उच्च मा. विद्यालय व हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय या दोन मोठ्या शाळेत भरमसाठ विद्यार्थी असून दोन्ही शाळेतील विद्यार्थी हे 83 टक्याच्यावर नाहीत. या सर्व यशवंत, गुणवंत उतिर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन मुख्याध्यापक गजानन रणखांब सर, मुख्याध्यापक आर.एन. सागर, मुख्याध्यापक एस .डी. चव्हाण, पर्यवेक्षक लक्ष्मण डाके, पर्यवेक्षक जी.जी. माने, आदीने केले.

