
नांदेड। भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रेल्वे बोर्डाचे सदस्य मारोतराव मष्णाजी वाडेकर यांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांची निवड झाली. निवडीबाबत बोलताना वाडेकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. मिळालेल्या संधीचा उपयोग पक्ष वाढीसाठी करु असंही वाडेकर म्हणाले

