
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या तालुका समूह संघटकाकडून आशा वर्करची आर्थिक पिळवणूक केली जाते आहे. आमच्याकडून प्रत्येक वेळी निघणाऱ्या मानधनातून प्रत्येक आशाकडून ५००० ते १०००० हजार रुपये जबदरस्तीने घेत असल्याची तक्रार नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आशा वर्कर महिलांनी केली आहे. त्यांची तालुक्यातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अन्यथा सर्व आशा कार्यकर्ती जिल्हा परिषद नांदेड समोर पुढील महिन्यात आमरण उपोषणास बसणार असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या समूह संघटक हे गेल्या २०१३ पासून हिमायतनगर तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्व आशा कार्यकर्ताकडून ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व स्वच्छता समिती च्या निधीमधले ५० ते ६० टक्के रक्कम घेतात. व ५००० ते १०००० रुपये प्रत्येक वेळी निघालेल्या मानधनातून पैसे आणून द्या असे म्हणून आर्वाच्च भाषा बोलून आपमानीत करुन धमकी देतात.


कधी लसीकरणाला आल्यानंतर व मासिक मिटींग मध्ये आपमाणित करतात. पैसे घेवून हिमायतनगरला या नाही तर मी तुमचे बघून घेईन नसता मानधन काढणार नाही. किंवा कामावरुन कमी करण्याची धमकी देत म्हणतात. आम्हाला स्त्री जातीला खालच्या दर्जाचे वागणूक देतात. तुम्हाला काय करायच ते करा माझ कोणीही वाकड करत नाही. तुम्हाला कोणाकडे जायचे जा अशी धमकी देवून पैसे वसूल करतात. तालुक्याचे अधिकारी, लेखपाल व जिल्ह्याचे अधिकारी माझ्या मर्जीतले आहेत मी कोणाला भित नाही अशी भाषा वापरतात.


त्यामुळे तालुक्यातील आशा वर्कर हैराण झाले आहेत, आमची आर्थिक लूट करून अपमानित करणाऱ्या तालुका समूह संघटक काची हिमायतनगर तालुक्यातून हकालपट्टी करावी. हाकालपट्टी नाही झाली तर आम्ही सर्व आशा कार्यकर्ती नांदेड जिल्हा परिषद समोर पुढील महिन्यात आमरण उपोषणास बसणार आहोत व त्यांच्या संपत्तीची पण चौकशी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
