माहूरl शहरातील जमदंग्नी खोरी ते पाडवलेणी परीसरात कळपामध्ये चरण्यासाठी सोडलेल्या बकर्या चोरी जात असल्यानचे फिर्याद दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये अहमद अली मोहम्मद अली यांच्या-२ बकर्या सयद्द मोहसिन स.खमरुदीन-४. शे.जहीर शे.फरीद -४ शे.अरीफ शे.लतीफ -४ शे.वजीर शे.वल्ली पाशा -२ हैदर खाॅ.पिर खॉ.पठान-४ अमजद खॉ.अनसार खॉ.पठान -१ असे एकुन २१ बकर्या किमंत अदांजे ५१ हजार रूपए वेगवेगळ्या दिवशी चोरी झाल्याची तक्रार दि,१९ मे रोजी सयद्द अहमद अली मोहमद्द अली रा,माहूर यानी दिली.
ज्या मध्ये काही संशईकाची नावे होती.या बकरी चोरी मुळे पशु पालकात भितीचे वातावरण होते, सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पण बकरी चोर हाती येत नव्हते. चोरांच्या मार्गावर असतांना दि,२५ मे रोजी सुगावा लागला कि शहराच्या उत्तरेकडील पांडवलेणी परिसरात बकरी चोर दबा धरून बसले आहेत, सपोनी श्रीधर जगताप, संजय पवार बिट जमादार विजय आडे पोहेका चंन्द्र प्रकाश नागरगोजे, रविन्द्र इंगोले, धनेश्वर वेलदोडे यांनी मोठ्या शिताफिने रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कैलास साहेबराव मोहिते वय २३ दत्तनगर , समीर बेग मिर्झा २२ रा वार्ड क्र, ५ , शोएब शब्बीर शेख २० सर्व रा,माहूर यांना माहूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
दि,२६ रोजी माहूरच्या न्यायालय उभे केले असता दि,२९ पर्यत पोलीस कोठडी दिली आहे,सदरील बकर्या ह्या किनवट,आर्णी पुसद या परीसरातील व्यापारीना विकल्याची कबुली दिली आहे. ही कार्यवाही माहूर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड, डॉ.खंडेराव धरणे भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात केली असुन पुढिल तपास बिट जमादार विजय आडे करत आहे