श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथे दि. २८ में, रोजी दुपारी १:०० वा.सर्वधर्मीय व बौध्द विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी या विवाह मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मेळाव्याचे आयोजक शोभा प्रकाश गायकवाड व प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नाव वधू वरांनी वयाचे २१ वर्षे व वधूचा १८ वर्षे वय पूर्ण झाल्याचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड , दोघांपैकी एकाचा जातीचा दाखला, वधू वरांचे १०० रु.च्या मुद्रांकवर शपथपत्र, प्रथम विवाह असल्याचे सरपंच पोलीस पाटील यांचे प्रमाणपत्र दोघांच्या सह्याचे आदी कागदपत्रे दाखल करणाऱ्या वधूवरांना कन्यादान योजने अंतर्गत २० हजार रूपये लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
या विवाह मेळाव्यात विवाह करणाऱ्या दोघापैकी एक अपंग असणाऱ्या दांपत्यांना ७० हजार रुपये कन्यादान योजने अंतर्गत मिळणार आहेत. अंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना ३ लाख २० हजार रुपये मिळणार आहेत. समाजातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा पैसा व वेळ वाचविण्याच्या उद्दात हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाचे हे २७ वे वर्ष असून लगातार २६ वर्षे पासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची महिती प्रकाश गायकवाड यांनी दिली.
मेळाव्याचे आयोजन रमामाता महिला मंडळ पडसा यांनी केले असून संयोजन समिती अध्यक्ष कुमार कांबळे,उपाध्यक्ष सुनील शेंडे, सचिव प्रदीप भगत,सहसचिव जितेंद्र शेंडे निमंत्रक राहुल भवरे, संघटक विष्णू शेंडे, कोषाध्यक्ष उत्तम मुनेश्वर सहकोषाध्यक्ष संतोष उमरे कार्याध्यक्ष सम्यक भवरे आदि परिश्रम घेत असून मेळाव्यास मौजे पडसा येथील समस्त नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याचे प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.या सामूहिक विवाह मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन डॉ.सत्यम प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.