उस्माननगर। उस्माननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजे चिखली ता.कंधार येथे २७/ मे रोजी अवैध देशी दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना आढळून आल्या प्रकरणी उस्माननगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२७ मे रोजी चिखली ता.कंधार येथे अवैध देशी दारू विक्री करताना देशी दारुचे दोन सीलबंद बाॅक्स व एम एलच्या खुल्या ( ४० ) चाळीस बाॅटल्स असा एकूण ९८००/ रुपयांचा माल आरोपी चंद्रकांत दिगंबर कदम वय (२२ वर्ष ) रा. चिखली हा दारुची चोरट्यां मार्गाने विक्री करताना आढळून आले प्रकरणी सदरली आरोपी विरोधात पो.स्टे.उस्माननगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई एपीआय भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय पल्लेवाड , पोलीस अंमलदार जायभाये ,शिवपूजे व सुर्यवंशी यांनी केली आहे.
परिसरात ड्रा डे असताना दलाल चोरट्यां मार्गाने मुळ किमंत न घेता चढ्या भावाने विक्री करताना सरस प्रत्येकांना चर्चेत ऐकण्यात येते.त्यावेळेस त्यांच्यावर अंकुश ठेवणारे पथक काय करते असा सुर नागरिकांमध्ये निघत आहे.ऐरवी कमी किमतीत असणारी दारू त्या दिवशी चढ्या भावाने विक्री केली जाताना समजते याकडे सुध्दा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.