नांदेड| तालुक्यातील बळीरामपूर येथील गंगाप्रसाद किशन बाबळे वय 22 वर्षे हा बीएसएफ पॅरामिलीट्री फोर्स या भरती प्रक्रियेत एससी प्रवर्गातून राज्यात दुसरा आला असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतूक होत आहे.
बीएसफ च्यावतीने 2021 मध्ये 57 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी गंगाप्रसाद बाबळे यांनी अर्ज केला होता. सुरूवातीला लेखी परिक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात आली यामध्ये गंगाप्रसादने चांगले गुण मिळविले आहेत. नुकतीच भरती प्रक्रियेतील निवड उमेदवारांची यादी जाहिर झाली असून गंगाप्रसाद हा राज्यातून 21 वा आला असून एससी प्रवर्गातून त्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गंगाप्रसादने हे यश संपादन केले असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतूक होत आहे. निवड यादी जाहिर होताच बळीरामपुर येथे त्याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रा.प.सदस्या भारतबाई दासरवाड, ज्ञानोबा दासरवाड, दत्ता बाबळे, राजु दासरवाड, पत्रकार सुरेश आंबटवार, रामचंद्र बाबळे, नितीन गायकवाड, बाळू दासरवाड, राहुल बाबळे, बंटी बाबळे, अजय सुर्यवंशी, अजय केळकर, सौरव बाबळे यांच्यासह आदी मित्रमंडळी उपस्थित होते.