नांदेड| विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या कर्तबगार महिलांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग च्या वतीने विविध महिलांना गौरविण्यात येते. यंदा २०२३ हा सावित्रीबाई फुले सन्मानचा चौथा वर्ष असून यावर्षी सदरील पुरस्काराचा समारंभ संत ज्ञानेश्वर सभागृह मध्ये दिनांक 29 मे 2023 रोजी विविध मान्यवरांचा उपस्थितीमध्ये पार पडला. यंदाच्या वर्षी सहा जणांना हा पुरस्कार दिला असून यात कलेच्या क्षेत्रात आपलं वेगळं ठसा उमटवणारे व पार्लिंगी समाज जागृती कार्यरत अग्रेसर असलेल्या डॉ. सान्वी जेठवाणी यांना हा सन्मान मिळाला आहे.
हा पुरस्काराचा स्वरूप म्हणजे सन्मान चिन्ह सावित्रीबाई फुले यांचं पुतळा स्वरूपात पुरस्कार चिन्ह शाल व वृक्ष असं या पुरस्कारा च्या स्वरूपात डॉ. सान्वी जेठवाणी यांना हे प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. आपलं मनोगत व्यक्त करत असतांना जेठवाणी यांनी अनेक समस्यांना तृतीयपंथींना सामोरे जावे लागते ज्या देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही लिंग भेद संपलेला नाही त्या देशात तृतीयपंथी कसा सुरक्षित राहील असा प्रश्न देखील त्यांनी मंचावरून मांडला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ हे प्रसिद्ध विधान शिवशक्तीच्या मिलाफाद्वारे उत्क्रांती या वैदिक विचारावर भर देते. येशूना त्यांचे ज्ञान त्यांच्या आईकडून प्राप्त झाले. सदाचाराने लढाई लढण्यासाठी शिवाजीचे संगोपन जिजाबाईंनी केले.
कालिदासांना त्यांच्या विद्वान पत्नीकडून नकार मिळाल्यावर कालिमातेची साधना करून ते प्रसिद्ध पंडित झाले असे अनेक उदाहरण आहेत जे या म्हणीला सार्थ करतात असे प्रतिपादन आपल्या भाषणातून व्यक्त केले. देश विकसित करायचं असेल तर प्रत्येक स्त्रीला आर्थिक दृष्टिकोनाने देखील सक्षम करणे गरजेचे आहे असे मत आणि अनेक समस्यांना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यात ज्या पाच दुसऱ्या पुरस्कार ज्यांना मिळालं ते संगीत साधनेत आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ गायिका कमलताई भोंडे, अमरावती, प्रशासकीय अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, मुंबई, आदिवासी बहुल प्रांतात वंचित व वनवासींच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या हेमलताताई बिडकर, नाशिक, स्वकष्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपमहाव्यवस्थापक पदाला गवसणी घालणाऱ्या श्रीमती प्रतिक्षा तोंडवळकर, मुंबई, महिला उद्योजिका आणि परिवहन व्यावसायिक जाई देशपांडे, सातारा या सर्व कर्तबगार महिलांना हा पुरस्कार मिळाला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास मंडळाच्या निर्भय कन्या अभियानांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येतो. या सन्मानाचे हे चौथे वर्ष असून यंदाच्या वर्षी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा.डॉ.संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शोध समितीने या नावांची निश्चिती केली असल्याचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे यांच्याकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती माधुरी सहस्त्रबुद्धे, व्यवस्थापन परिषद सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार असे अनेक मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.