भोकर, रवी देशमुख। आज रोजी इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून नेहमीप्रमाणेच याही वर्षी श्री शाहू महाराज हायस्कूल भोकरचा निकाल ९५.०३% लागला असून उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयाची विद्यार्थिनी कु प्रियंका दशरथ तोडके ही ९८% गुण घेऊन तालुक्यातून पहिली आली आहे. टोकलवाड पार्थ आनंद ९५.६८, कु कुलकर्णी समिक्षा गोविंद ९५.२०, यांसह एकूण ८६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक विदयालय हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर नाव असून सुरवातीपासूनच या विदयालयात 100% कॉपीमुक्त अभियान राबवून परिक्षा घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या यशात विद्यार्थ्यांबरोबरच श्री शाहू महाराज विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच पालक यांचा सिंहाचा वाटा आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. गोविंदरावजी पाटील लामकानीकर, सचिव शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, नूतन शिक्षण संस्थेचे सचिव श्री कैलासभाऊ देशमुख गोरठेकर,श्री भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील कार्लेकर, सहसचिव श्री राजेश्वरराव वंगलवार, नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गोविंदरावजी शिरूरकर, श्री सुभाषरावजी देशमुख गोरठेकर, मुअ. श्री संजय देशमुख कामनगावकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.