नांदेड। जिल्हा मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन नांदेड च्या वतीने एम. आय. टी. ज्युनियर कॉलेज नांदेड येथे दिनांक 28 मे 2023 रोजी संघटनेच्या अध्यक्षा- अनुराधा शिंदे, सचिव- एकनाथ पाटील, समन्वयक- नफीस शेख यांच्या वतीने एम.आय.टी. ज्युनिअर कॉलेज येथे खुल्या महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथून एकूण 274 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये काता व कुमिते या दोन प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी संभाजीनगरचे यश रोकडे, अनिल वाडेकर, राजश्री गाडेकर, लातूरचे अजमेर शेख, हिंगोलीचे संतोष नागरे, मोईन शेख, नांदेडचे गजानन गिरडे, संघपाल भंडारे, आकाश भोरे, मनोज पतंगे, नितीन धेडे, विशाल गायकवाड, संगम बोरकर, सृष्टी पांचाळ, अरुण कळसाईत, आतिफ पटेल, स्नेहल जाधव, दिशा चित्तारे, गोविंद इंगोले, प्रतीक्षा थोरात, आदित्य कोटगिरे, प्रणव वारकड, ज्ञानेश्वर ढाले, मस्के सर, सृष्टी मोतेवार, सक्षम गुळवे, सर्वांनी पंच म्हणून कार्य केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कपिल गायकवाड, प्रथमेश नवले, सौरभ पवार, वैभव हाडमोडे व इतर यांनी परिश्रम घेतले स्पर्धेमध्ये पदक पटकावलेल्या खेळाडूंचे अभिनंदन एम.आय.टी. चे प्राचार्य अभिजीत कुरे पाटील सर, पवार सर, यांनी केले आहे.