नांदेड। जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांची नांदेड तालुक्यातील भायेगाव, थुगांव, गंगाबेट, वाहेगाव व भणगी गावातील अवैध वाळु उपसा करणाऱ्या लोकांवर धाडसी कार्यवाही करत दिनांक 31 मे ते 02 जुन,23 पर्यंत जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर रोज स्वतः वरील गावातील वाळु घाटावर जाऊन पथकासह धाडसत्र करुन अवैध वाळु उपसा करणारे यंत्र, तराफे, पाईप लाईन, मडपंप इत्यादी साहित्य जप्त व नष्ट करुन साहित्य तहसील कार्यालयात जमा केले आहे.
दिनांक 31.मे 23 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी स्वतः व तहसीलदार नांदेड संजय वारकड, नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड मुगाजी काकडे यांचे सह गोदावरी नदी पात्रात जाऊन पाहणी केली असता सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळु उपसा होत असल्याचे आढळुन आले. यावेळी त्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने सदर सक्शन पंप स्फोट घडवुन नष्ट केला व 34 लोखंडी पाईप व 65 लोखंडी टाक्या जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केल्या. दिनांक 01.जुन 23 रोजी मौ. गंगाबेट येथे जाऊन 20 तराफे जाळुन नष्ट केले व वाळु उपसा करणारे गुडगुडी नावाचे यंत्र जिलेटीनचा स्फोट करुन नष्ट करण्यात आले.
दिनांक 02.जुन 23 रोजी मौ. थुगाव येथे वाळु उपसा करणाऱ्या 16 टाक्या व 8 पाईप जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केल्या. तसेच मौ. भणगी येथे 22 तराफे जाळुन नष्ट केल्या आहेत. व वाळु उपसा करणारे 3 इंजीन जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केले आहेत. याच वेळी मौ. वाहेगाव येथे 20 तराफे जाळुन नष्ट केले आहेत. तसेच अवैध वाळु उपसा करणारे छोटे टिप्पर 407 क्र. MH 23 W 1826 व MH 10 AQ 1431 अशी दोन वाहने जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केले आहेत. सदर कार्यवाही मागील 3 दिवसांपासुन अहोरात्र चालु असुन तहसील कार्यालयाचे पथक रोज रात्री उशिरापर्यंत जागुन वरील कार्यवाही केली आहे.
वरील कार्यवाही यशस्वी करण्यासाठी नांदेड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी श्री अनिरुध्द जोंधळे, खुशाल घुगे, कुणाल जगताप, प्रमोद बडवणे, हेमंत सुजलेगावकर व राजेंद्र शिंदे तलाठी कैलास सुर्यवंशी, रामेश्वर भिंगोरे, आकाश कांबळे, राहुल चव्हाण, उमाकांत भांगे, माधव भिसे, इश्वर मंडगीलवार, मनोज देवणे, संताजी देवापुरकर, सय्यद मोहसीन, सचिन नरवाडे वाहन चालक शेख जहिरोद्दीन, किरण श्रीवास्तव यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलीस स्टेशन लिंबगाव व नांदेड ग्रामीण यांनी पुरेसा बंदोबस्त पुरविला होता. अवैध वाळु उपसा करणाऱ्या व वाहतुक करणाऱ्या सर्व लोकांवर व त्यांच्या वाहनांवर यापुढेही अशीच दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.