नांदेड। शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंढार हवेली येथे तारीख एक जून रोजी बोद्ध युवक अक्षय भालेराव याचा चाकूने भोसकून निर्घृन खुन करण्यात आला असून दुसरा भाऊ आकाश भालेराव यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले आहे.
त्या पीडित कुटूंबीयांची भेट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने शनिवारी बोंढार येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली.
शिष्टमंडळामध्ये माकप चे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.विनोद गोविंदवार, जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड शहर, आणि तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, जि.क.सदस्य कॉ.मंजूश्री कबाडे, शहर कमिटी सदस्य कॉ.लता गायकवाड व कॉ.जयराज गायकवाड आदींचा समावेश होता. हत्या करणारे सर्व सवर्ण असून त्यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी व खुनाच्या गुन्ह्या सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.