उस्माननगर, माणिक भिसे। माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शिराढोण परिक्षा केद्रातुन सर्वप्रथम समता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी चावरे विश्वभुषण भारद्वाज याने ९३.२ टक्के गुण घेऊन आव्वल ठरला आहे.
जाहीर झालेल्या निकालामध्ये उस्माननगर ता.कंधार येथील समता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालांत उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयातील एकंदरीत विशेष प्राविण्यासह साठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर प्रथम श्रेणीत तीस तर व्दितीय श्रेणीत बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शाळेचा पूर्ण निकाल ९६.२०टक्के लागला असून शिराढोण परिक्षा केद्रातुन विश्वभुषण भारद्वाज चावरे यास ९३.३ टक्के गुण मिळवून केंद्रातून व शाळेतून सर्व प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर शिवलिंग श्यामराव शेकापूरे यांने ९० टक्के गुण घेऊन शाळेतून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
राजेश्री वडजे हिला ८९.८ टक्के गुण,रावण घोरबांड ८९.६ टक्के गुण ,साक्षी गायकवाड हिला ८९.२/ टक्के गुण , श्रुती बास्टे हिला ८८.८ टक्के गुण ,सवीता मोरे हिला ८८.६ टक्के गुण , श्रीनाथ ऐकलारे ८८.४ टक्के गुण ,अब्दुल रहेमान हार्षद शेख यास ८८.४ टक्के गुण ,सुमित इंगोले यास ८८.२ टक्के गुण ,शिवपुजा पोटजळे हिला ८८.२ टक्के गुण तर जयश्री नारायण भिसे हिने ८० टक्के गुण घेऊन मागासवर्गीय मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. याच्यासह अदी विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव आंबेकर व संस्थेचे संचालक मंडळ , शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
दोन जून रोजी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बोधनकर , भिसे, वाघमारे कोचिंग क्लासेस कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यानी कोचिंग क्लासेस सहशिक्षकाचे फार मोठे योगदान ,व वेळेवर मार्गदर्शन केल्यामुळे दहावीच्या परीक्षेत यश संपादन करता आल्याचे सांगून आभार मानले.