हिमायतनगर। राजा भगीरथ मा. व उच्च मा.विद्यालय हिमायतनगर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी.बोर्ड परीक्षा 2022-2023 मध्ये घवघवीत यश संपादन केले असून, उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून तालुक्यातुन प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
एस.एस.सी.बोर्ड परीक्षा 2022-2023 मध्ये एकुण विद्यार्थी संख्या = 273 परीक्षेस बसले होते, त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 216 असून, राजा भगीरथ शाळेच्या एकूण निकालाची टक्केवारी = 79.12% आली आहे. यामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या = 39, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी संख्या =74, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 62, तर तृतीय श्रेणीत उत्तीर्ण संख्या = 41 विद्यार्थी आहेत .
यात ऋुषीकेश संतोष साभळकर या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळवीत 97% गुण मिळविले आहेत. संकेत सचिन घुले या विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक मिळवीत 95.80% गुण घेतले आहेत. तर प्रतिक विजयकुमार राठोड या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक घेऊन 94.60% गुण मिळविले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मेहनती शिक्षकांचे मु.अ.श्री रमेश सागर, पर्यवेक्षक कमलाकर दिक्कतवार व संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक यांनी अभिनंदन केले.