नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथे एका शेतकऱ्याच्या (बैल) गोऱ्यावर दिनांक ४ जुन २०२३ रोजी दुपारी पावणे चार वाजता झाडाखाली बांधलेल्या (बैल)गो-यावर वीज पडून बैल ठार झाला असल्यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथील गरीब शेतकरी यांनी आपल्या शेतात असलेल्या झाडाखाली ७० ते ८० हजार रुपयांच्या गोऱ्याला झाडाखाली बांधले होते व सदरचा शेतकरी श्रीकांत हनमंतराव निकलपुरे यांनी त्यांच्या शेतात २०० फूट अंतरावर कडबा जमा करीत होता दिनांक ४ जुन २०२३ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन सदरील शेतकऱ्याच्या गोऱ्यावर वीज पडून गोरा ठार झाला आहे.
नायगाव तालुक्यात दिवसभर कडाक्याच्या उन्हात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले व चार ते पावणे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वारे सुटले व त्यातच पावसाने जोर धरला आणि विजेच्या कडकडाटमध्ये लालवडीच्या एका शेतकऱ्यांच्या गोऱ्या वर वीज पडल्याने सदरचा लाल गोरा यांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये बाजार भावाने होत असल्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्याला मदत देऊन सहकार्य करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.