नायगाव, रामप्रसाद चन्नावार।पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नायगाव तालुक्यातील अहिल्यानगर चारवाडी येथे जय मल्हार युवा मित्र मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर चौकाचे अनावरण प्रख्यात साहित्यिक,कवी तथा चित्रकार बालाजी पेटेकर खतगावकर, यांच्या हस्ते करण्यात आले.माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील चाडकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर माजी सरपंच साहेबराव मावले सर यांच्या हस्ते पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
दिगंबर माने सर, यांच्या उपस्थितीत, यादवराव शिंगणे ,शामराव पो.पाटील चाडकर, माधवराव पा.शिंगणे सौ.सुलोचना खनपट्टे ग्रा.प.सदस्या, सौ.सुमित्रा खनपट्टे ग्रा.प. सदस्या,रानबा पा. मावले,बालाजी पा.खनपट्टे,रुखमाजी पा. खनपट्टे, बालाजी पा.मावले, साईनाथ पा. चाडकर मोहनराव पा. मवले, मंडळाचे अध्यक्ष, श्रीनिवास पा. खनपट्टे आदी युवा मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये चारवाडी अहिल्यानगर येथील मंदिरासमोरील भव्य चौकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देऊन अहिल्यादेवींच्या कर्तुत्वाचा आणि भव्य अशा नेतृत्वाचा इतिहास सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न या गावातील युवा मल्हार सैनिकांनी केलेला आहे.
ध्वजारोहण करून येळकोट येळकोट जय मल्हार पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवींचा विजय असो अशा घोषणा देऊन गावातील उपस्थित मान्यवरांच्या व युवा मल्हार सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अहिल्यादेवी होळकरांच्या आणि जय मल्हार युवा मित्र मंडळाच्या शाखेचे ही या ठिकाणी अनावरण करण्यात आले. यावेळी गावातील युवा मल्हार सेनेचे कार्यकर्ते लहान थोर व जेष्ठ मंडळी महिला मंडळीची विशेष उपस्थिती होती.