हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार। शहरातील नालंदा बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी थायलंड येथून आणण्यात आलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठपणा करण्यात आली. हा धार्मिक कार्यक्रम दोन सत्रात संपन्न झाला. ध्वजारोहण झाल्यानंतर बुद्ध मूर्तीची शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठया प्रमाणावर शुभ्र वस्त्र परिधान करून बौध्द उपासक सहभागी झाले होते.
बौद्ध मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने मिरवणूक महामार्ग जवळील परमेश्वर मंदिर कमानीपासून शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक उपासीकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून रॅलीत सहभागी झाले होते. सदरील रॅली शांततेत संपन्न व्हावी यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बि डी भूसनूर यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता. त्याचबरोबर समता सैनिक दलाचे सैनिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मिरवणूक शिस्तीमध्ये संपन्न व्हावी यासाठी समता सैनिक दलाचे नांदेड येथून आलेले सैनिक बोधीपाल जमदाडे, मारुती कदम, अरुण गिरगिडे, मनोज कदम, संजय कदम, मारुती धुळे, अमोल चंद्रे, बाबुराव सावतकर, कोंडबा पाईकराव, अनिल हाटे,खंडू बनसोडे तर महिला समता सैनिक दलाच्या नंदाबाई उंबरे, पुष्पा वाढवे, अनुसया कांबळे यांनी सदरील रॅलीचे व्यवस्थापन केले.
मिरवणूक नालंदा बुद्ध विहार येथे आल्यानंतर येथील बौद्ध विहारात थायलंड येथून आलेल्या बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भिकू संघाच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी भदंत धम्म सेवकजी महाथेरो मुळावा, भदंत विनयबोधिप्रिय नांदेड, भिकू पायारत्न थेरो नांदेड हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भदंत धम्म सेवकजी महाथोर मुळावा यांनी धम्म देसना दिली.
या कार्यक्रमास महाउपासक डॉ. एस पी गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाअध्यक्ष डॉ. यशवंत चावरे, ए. एस.जाधव, डॉ. रविकिरण जोंधळे, सा.ना.भालेराव, उपस्थित होते. त्याचबरोबर हिमायतनगर येथील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रताप पी लोकडे, सरचिटणीस सुरेश गडपाळे सर, कोशाध्यक्ष शिवाजी कदम सर, संस्कार प्रमुख तथागत रिंगणमोडे, एम. यू. हनवते, बाबासाहेब मुनेश्वर यांनी मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.